Loading Now

विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामध्ये पुढाकार घेणे आवश्यक- उद्योजक जालिंदर गागरे

संगमनेर, ता. २७ अलीकडील काळात माहिती तंत्रज्ञानाची व्याप्ती वेगाने वाढत असून, त्याचा प्रभाव शेती, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रावरही दिसून येत आहे. विशेषतः शेती व उद्योग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि पर्यावरण संरक्षण यासाठी उपयुक्त ठरत आहे. तथापि, त्यासोबत अनेक आव्हाने देखील आहेत, जी कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे मत उद्योजक जालिंदर गागरे यांनी व्यक्त केले.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वाणिज्य व व्यवस्थापन विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वाणिज्य व व्यवस्थापनातील कृत्रिम बुद्धिमत्ता: भविष्यातील संधी व आव्हाने” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. उद्घाटन प्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संचालक प्रा. बाबा खरात, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक डॉ. विजयकांत बैरागी, प्रा. लक्ष्मण घायवट, प्रशासन अधिकारी गोरक्षनाथ पानसरे, प्रा. दत्तात्रय गाडेकर, प्रा. जयराम डेरे, प्रा. गणेश थोरात, प्रा. श्रीनिकेत लंगोटे आदी उपस्थित होते.माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. व्यावसायिक निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कार्यक्षमता वाढवून खर्चात बचत करतो. तसेच ऑनलाइन व्यवसाय, स्मार्ट व्यवस्थापन प्रणाली आणि भविष्यातील संधी व कौशल्य याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा आहे.चौकट- या परिषदेत घेतला सहभाग….वाशी, नवी मुंबई येथील वाणिज्य विभागाच्या अधिष्ठाता डॉ. हर्षा गोयल, न्यू आर्ट्स महाविद्यालय, अहिल्यानगरचे बी.बी.ए विभाग प्रमुख डॉ. मंगेश वाघमारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. कावेरी लाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे, कोपरगाव महाविद्यालय वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉ. संजय देवकर, न्यू आर्ट्स महाविद्यालय, अहिल्यानगरचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संजय कळमकर यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले…………………………………………………………

Share this content:

महाराष्ट्रातील स्थानिक घडामोडी, शेती, आरोग्य, उद्योग, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी डिजिटल व्यासपीठ.

Post Comment

YOU MAY HAVE MISSED